Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Aug 25th, 2020

  घरीच किंवा घराजवळ विसर्जन करा!

  मनपाचे आवाहन : ‘विसर्जन आपल्या दारी’ संकल्पनाही राबविणार

  नागपूर : कोव्हिड-१९ विषाणूचे संक्रमण लक्षात घेता यंदाचे सर्वच उत्सव हे शासनाचे दिशानिर्देश आणि नियमांचे पालन करून साजरे करायचे आहे. गणेशोत्सव हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय. सार्वजनिक गणेशोत्सव नागपुरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मात्र यंदा शासन आणि प्रशासनाने केलेल्या आवाहनाची दखल घेत सर्वच मंडळे नियम पाळत उत्सव साजरा करीत आहे. आता घरगुती गणेशाच्या विसर्जनाची लगबग सुरू झाली आहे. सर्व नागरिकांनी घरगुती गणेशाचे वितरण शक्यतो घरीच करावे. आवश्यकता असेल तर घराजवळच्याच कृत्रिम टँकमध्ये केवळ दोन व्यक्तींनी जाऊन विसर्जन करावे, तर सार्वजनिक मंडळांनीसुद्धा तलावावर विसर्जन न करता मंडळाच्या जवळपास कृत्रिम तलावात किंवा तशी व्यवस्था करून विसर्जन करण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेने केले आहे.

  यापूर्वीच नागपूर महानगरपालिकेने कुठल्याही तलावावर श्री च्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ नये, असे आवाहन केले होते. दरम्यान घरगुती गणेशाचे दीड दिवसापासून विसर्जन सुरू झाले. सार्वजनिक ठिकाणी, तलावावर गर्दी होऊ नये याची काळजी नागरिकांनी घ्यायची आहे. त्यामुळे घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच करण्यात यावे, असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले आहे. यापुढे पाचव्या, सातव्या अथवा दहाव्या दिवशीचे विसर्जन सर्व नागरिकांनी घरी किंवा सोसायटीत व्यवस्था करून करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  ‘विसर्जन आपल्या दारी’
  नागपूर महानगरपालिका मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी ‘विसर्जन आपल्या दारी’ ही संकल्पना राबवित आहे. यासाठी झोननिहाय ‘विसर्जन रथा’ची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक झोननिहाय संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यास ‘विसर्जन रथ’ घरी येईल. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. यासाठी झोननिहाय संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. लक्ष्मीनगर झोन सचिन लोखंडे (७६२०१८७१०१), सुधीर अडकिने (७०५८५३६४२१), धरमपेठ झोन दीनदयाल टेंभेकर, झोनल अधिकारी (९८२३२४५६७१), हनुमाननगर झोन दिनेश कलोडे, झोनल अधिकारी (९८२३२४५६७३), नवीन मेश्राम (७०५७७३३२५५), धंतोली झोन धर्मेंद्र पाटील, झोनल अधिकारी (७८७५५५१८८३), लांजेवार (७५१७३६८६११), नेहरूनगर झोन विठोबा रामटेके, झोनल अधिकारी (९८२३३१३०६४), दहिवाले (९९६०७४०७६५), दिवाकर (९८२२९३८०१६), गांधीबाग झोन सरेश खरे, झोनल अधिकारी (९६३७०७३९८७), सतरंजीपुरा झोन प्रमोद आत्राम, झोनल अधिकारी (९८२३२४५६७९), नागपुरे (७०३०५७७६५०), लकडगंज झोन विनोद समर्थ (७७९८७३४३५५), आशीनगर झोन किशोर बागडे, झोनल अधिकारी (९८२३३१३१०२), अमर शेंडे (९०२२५७१८४९), दूरध्वनी-०७१२-२६५५६०५, मंगळवारी झोन महेश बोकारे, झोनल अधिकारी (९८२३२४५६७२),रमेश देशमुख (७०६६२६२३५४), नितीन गोरे (९८५०६६०५६६). नागरिकांनी त्यांच्या संबंधित झोनमधील क्रमांकावर फोन करून विसर्जन रथ बोलवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145