Published On : Wed, Jul 24th, 2019

कामठी तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करुन त्वरित शेतक-यांना आर्थिक मदत करा

कामठी:-कामठी तालुका कांग्रेस कमेटी , महिला कांग्रेस कमेटी, युवा कांग्रेस कमेटी यांच्या सयुक्त विद्यमाने तालुका अध्यक्ष नानाभाऊ कंभाले ,महिला कांग्रेस तालुकाध्यक्ष प्रा. अवंतिका लेकुरवाळे, युवाध्यक्ष दिनेश ढोले यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री . यांना तहसिलदार द्रारा निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदनात त्वरित सर्वेक्षणचे आदेश देवुन कामठी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा,.नुकसानग्रस्त शेतक-यांना त्वरित अर्थसहाय्य करा., कृषिविजबील माफ करा, विहिरगावला नागनदिवर झालेल्या बंधा-यामुळे नागनदिचे पाणी वळते केल्याने पाढुर्णा, खेडी शिवनी इ. गावात दुष्काळातही सिंचन बंद झालं त्यामुळे त्वरित कोराडीला वळत केलेल पाणि बंद करावं, अशा अनेक मागण्यांचे उल्लेख करण्यात आला. आणि दोन दिवसात या दिशेने निर्णय घेतला नाही तर रस्त्यावर उतरुन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी दिला.

याप्रसंगी प्रामुख्याने प्रदेश युवा कॉग्रेस महासचिव अनुराग भोयर, इर्शाद शेख, युवा कॉ. कामठी विधानसभा महासचिव अतुल बाळबुधे, निखिल फळके, युवा नेतृत्व सचिन भोयर, आशिष मल्लेवार, तरोडी उपसरपंच अमोल महाले, विठ्ठलजी महाल्ले, परमेश्वर चिकटे, सचिन चिकटे इ. महिला व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी