Published On : Wed, Jul 24th, 2019

सोनेगाव येथे वृक्षरोपण करून संवर्धनाचे आवाहन..

कामठी :-कामठी तालुक्यातील गुमथळा जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामपंचायत सोनेगाव राजा येथे ३३कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत भारतीय जनता पार्टी कामठी मौदा विधानसभा प्रमुख माजी जी प सदस्य अनिल निधान यांच्या हस्ते गावात सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले

या कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक घरी अनिल निधान यांच्या हस्ते विविध प्रकारचे रोपट्याचे वृक्षारोपना साठी वाटप करण्यात आले याप्रसंगी अनिल निधान यांनी पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्षारोपणाला महत्त्व देऊन त्याचे संगोपन गावकऱ्यांनी निष्ठेने करावे असे आवाहन केले गावात वृक्षारोपण करून संगोपनाची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन व सामान्य नागरिकांनी स्वीकारली

Advertisement

यावेळी प्रामुख्याने माजी प स सभापती सेवक उईके, सरपंच चंदू हेवट ,उपसरपंच महेंद्र ढोले, दिलीप मुळे, सुरेश ढोले ,लक्ष्मण कराळे, भीमराव महल्ले, नीलकंठ भगत, लोकेश मारोडे, गोलू वाघ, धनंजय माळोदे, गोलू वाघ ,धनंजय माळोदे, राजू राणे, राहुल महल्ले, बालू महल्ले ,योगेश डाफ, राजू मेश्राम ,व ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement