Published On : Mon, May 4th, 2020

लॉकडाऊन असूनही वाळू माफियांचा अवैध वाळू उत्खनन जोमात

Advertisement

कामठी :-संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव नोयंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासन काटेकोर प्रयत्न करून प्रशासकीय कामात व्यस्त आहेत याचाच गैरफायदा घेत कामठी तालुक्यातील वाळू माफिये रेती उनगाव रेती घाटातुन अवैध वाळू उत्खनन जोमात करून उत्खनन करण्यात आलेले अवैध वाळू साठा आजनी गादा मार्गाच्या कडेला साठवून ठेवत आहेत .

नुकतेच मागील आठवड्यात नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस विभागाने एक अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक ताब्यात घेऊन कारवाहिस्त्व पोलीस स्टेशन ला लावण्यात आला

दरम्यान यासंदर्भात तहसील कार्यालयाला झालेल्या पत्रव्यवव्हारातून कारवाहो करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले मात्र पोलिसांनी यामध्ये आपले हात ओले करून कारवाहो न करताच अवैध वाळू चा ट्रक सोडण्यात आला यात या अवैध वाळू वाहतुकीला पुनश्च उधाण येत तालुक्यातील रेती घाटातुन अवैध वाळू उत्खनन जोमात सुरू असल्याने या अवैध वाळू माफियांना प्रशासनाची किती भिती आहे यावरूनच दिसुन येते.

संदीप कांबळे कामठी