| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, May 4th, 2020

  लघुशंकेला गेलेल्या बांधकाम मजुराचा रुग्णालयाच्या बाथरूम मध्येच मृत्यु

  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बजरंग पार्क रहिवासी एका बांधकाम मजुराची अचानक प्रकुतीत आलेल्या बिघाडामुळे त्वरित नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेतले मागील तीन दिवसापासून घेत असलेल्या उपचारा दरम्यान काल रात्री 12 वाजता लघुशंका करण्यासाठी रुग्णालयाच्या बाथरूम मध्ये गेले असता बाथरूम करता करताच अचानक खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दुवी घटना घडली असून मृतक बांधकाम मजुराचे नाव हरोभाऊ लक्ष्मण नेवारे वय 48 वर्षे रा बजरंग पार्क कामठी असे आहे.

  घटनेची माहिती मिळताच मृतकाच्या आप्तस्वकीय कुटुंबियांसह शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय समितीचे सल्लागार अध्यक्ष डॉ महेश महाजन यानो घडलेल्या मृत्यू संदर्भात आश्चर्य व्यक्त करीत इतक्या मोठया रुग्णालयात अकस्मात उपचारार्थ उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णाचा थेट मृत्यू होणे ही एक निंदनीय बाब आहे तर यासारखा मृत्यूचा प्रकार हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा चा प्रकार आहे तेव्हा या मृत्यू प्रकरणात वैद्यकीय उपचारा दरम्यान हयगय करणाऱ्या संबंधीत वैद्यकीय अधिकारी तसेच प्रभारी वैद्यकीय अधीक्षक वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करीत स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली आहे

  यासंदर्भात पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागपूर च्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले.या घटनेने कुटुंबाचा कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबात शोकाकुल वातावरण पसरले आहे तर मृतकाच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.

  संदीप कांबळे

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145