Published On : Wed, Sep 25th, 2019

पिपरी येथे ज्वलंत समस्या व स्वच्छेते कडे दुर्लक्षच

कन्हान : – पिपरी प्रभाग क्रं ३ मधील ज्वलंत समस्या व स्वच्छते कडे सत्तापक्ष उपाध्यक्ष सहीत नगसेवकांचे दुर्लक्षच असुन प्रभागात मनमानी कारभार सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत प्रभाग क्रं ३ मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकवसाहती मधिल रस्त्या लगत झाडीझुडपी वाढुन सध्या बेवारस कुत्रे, डुक्करे, सरपटणारे प्राण्याचे वास्तव्य वाढुन त्यांच्या अस्वच्छतेने रस्त्यावरच दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अतिवृष्टी व पावसाचे पाणी व सांडपाणी साचुन डासांच्या प्रमाणात वाढ होऊन नागरी वसाहतीत दुषित पाण्यामुळे जिवघेणा रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नसताना सुध्दा नगरपरिषद प्रशासना व्दारे लोकांचा तक्रारी कडे दुर्लक्षाची भुमिका घेतली आहे.

तसेच संपूर्ण पिपरी परीसरात पिण्याचे पाणी पुरवठा करणारी टाकी जिर्ण झाली असून तिला तडे गेले असुन कधीही कोसळुन धराशाही होऊ शकते. याबाबत युवा समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार यांनी तोंडी व लेखी वारंवार तक्रार केली आहे. तरीही आज पर्यंत पिपरी वासीयांना या जिर्ण झालेला टाकीतुनच पाणी पुरवठा ब्लीचिंग व औषध न टाकता केला जातो. पावसाचे दिवस असल्याने या पाण्यामुळे अनेक जिवघेणा रोगराईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या प्रभाग क्रं ३ मध्ये उपाध्यक्ष सह चारही नगरसेवक सत्ता धारी भाजपाचे असुन वारंवार नाली बांधकाम, चांगला सिमेंट रस्ता खोदुन पुन्हा नव्याने सिमेट रस्ता बांधकामाच्या कंत्राट मध्ये जास्त लक्ष देत असून ज्या रस्त्याचे सिमेंट रस्ता बांधकाम गरजचे आहे.

त्या ठिकाणी डागडुजी करण्यात आली नाही. जिथे नाली व रस्ता बांधकामाची खरच गरज आहे तिथे न करता विशिष्ट लोकांचा घरासमोर नाली व सिमेंट रस्ता तयार करण्यात येत आहे. या मनमानी कारभाराची वारंवार तक्रारी करूनही नागरिकांच्या जिवघेणा ज्वलंत समस्येकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याची नागरीकांची ओरड आहे. यास्तव जिल्हा शासन प्रशासन अधिका ऱ्यांनी या विषयांचा गांभीर्याने लक्ष देवुन ज्वलंत समस्या त्वरित सोडविण्यात येऊन समान नागरी जिवन व्यापनाचा हक्क द्यावा अशी मागणी युवा समाज सेवक प्रशांत बाजीराव मसार, भोला भोयर, महाविर कडु, कुंदन रामगुंडे, क्रिष्ण गांवडे, प्रल्हाद पहाडे, जिवन मरसकोल्हे, रामु कावळे, गोपाल मसार, गौरीशंकर आकरे, संदिप भोस्कर, संजय गुडधे सह पिपरी ग्रामस्थानी केली आहे.