Published On : Tue, Apr 28th, 2020

तांदूळ तर मिळाले भाऊ, भाताले कशासोबत खाऊ?

Advertisement

नगरसेवक प्रतीक पडोळे चे तहसीलदार ला निवेदन सादर

कामठी :-कोरोना व्हायरस चा संसर्ग टाळण्यासाठी कामठी शहरात लॉकडाऊन लागू केल्याने कुनोही नागरिक अन्न धान्यापासून वंचित राहू नये यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करीत असून शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनेच्या लाभासह प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत शिधापत्रिका धारकाच्या प्रति सदस्यला पाच किलो तांदूळ हा मोफत मिळत आहे मात्र यासोबत दाळ, तिखट, तेल वा इत्यादी काहीही न दिल्यामुळे अशा बिकट परिस्थितीत तांदूळ तर मिळाले पण आता भाताले कायच्यासोबत खाऊ अशी व्यथा गोरगरीब व रोजंदारीने काम करणाऱ्या गरजू लोकांची व्यथा असल्याने शिधापत्रिकेच्या लाभार्थ्यांना तांदळासोबत दाळ, खाद्य तेल वा तिखट देण्यात यावे अशी मागणी प्रभाग क्र 16 चे नगरसेवक प्रतीक पडोळे यांनी तहसीलदार अरविंद हिंगे यांना दिलेल्या निवेदनातुन केले आहे.

लॉकडाउन च्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत शासनाने शिधापत्रिके वरील प्रत्येक व्यक्तींना पाच किलो तांदूळ मोफत वितरण सुरू केले आहे मात्र तांदळासोबत तेल ,दाळ अन्य काहीही वितरण न केल्याने तांदळाचा भात कशासोबत खायचे असा नवीन पेच निर्माण झाला आहे.मागील तीन आठवड्या पासून सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे सर्व हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे खिशात एकही रुपया शिल्लक राहला नाही त्यात शासनाने धाण्यासोबत तेल तिखट दाळ मीठ दिले असते तर बरे झाले असते.

संदीप कांबळे कामठी