मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. २०१९ साली सत्तासंघर्षाच्या घडामोडी सुरु असताना मी टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट गेली, असे वक्तव्य शरद पवार यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. शरद पवार यांनी गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केले.देवेंद्र फडणवीस यांना सत्तेशिवाय करमत नव्हते, ते सत्तेशिवाय जगू शकत नव्हते. त्यांची ही अस्वस्थता महाराष्ट्रासमोर येणे गरजेचे होते.
मात्र या सर्व घडामोडींशी नरेंद्र मोदी यांचा संबंध नव्हता, असे पवार म्हणाले.
समोर शरद पवार म्हणाले की , देखील जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मी क्रिकेट खेळलो नसलो तरी मला गुगली कसा आणि कुठे टाकायचा, हे चांगलं माहिती आहे. समोरचा विकेट देत असेल तर ती घेतलीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे त्यांची विकेट गेली, हे सांगतच नाहीत. पण पहाटेच्या शपथविधीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी काय करु शकतात, कोणत्या थराला जाऊ शकतात, हे दिसून आल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस म्हणतात की, शपथविधीच्या आधी आमची बैठक झाली होती, पण दोन दिवसांनी शरद पवार यांनी भूमिका बदलली.
यावरून जर मी धोरण बदलले असताना देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं? मी नकार दिल्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी चोरून शपथ का घेतली? देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याची खात्री होती तर मग त्यांनी चोरून शपथ का घेतली? फडणवीस यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असता तर सरकार दोन दिवसांत कोसळले असते का? राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नसल्यानेच देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. पण फडणवीस यांच्या या कृतीचा स्वच्छ अर्थ होता की, सत्तेसाठी आम्ही कुठे जाऊ शकतो. त्यांचा हा चेहरा समाजासमोर याव, याअनुषंगाने काही गोष्टी करण्यात आल्या होत्या, असे शरद पवार म्हणाले.