Published On : Mon, Aug 3rd, 2020

वेळीच निदान व उपचार केल्यास कोरोना हमखास बरा होतो:-जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

Advertisement

कोरोनापासून होणारी मृत्यूसंख्या कमी करण्यासाठो कोरोनावर मात करण्यात यश मिळवा-जिल्हा धिकारी ठाकरे

कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नागपूर जिल्ह्यात चांगलाच पसरला असून नागपूर जिल्ह्यातील एकूण 13 तालुक्यापैकी एकट्या कामठी तालुक्यात कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या ही सर्वाधिक असून नागपूर जिल्ह्यातील एकूण 13 तालुक्यात झालेल्या 19 कोरिणाबधित मृत्यूपैकी 16 कोरोणाबधित रुग्ण हे कामठी शहरातील मृत्युमुखी पडले आहेत तेव्हा या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाची भीती न बाळगता वेळीच पुढाकार घेऊन उपचार घेणे गरजेचे आहे जेणे करून कोरोनावर मात करून मृत्यूपासून बचाव करता येईल.

कोरोना विषाणू हा जीवघेना नसून एक व्हायरस आहे तेव्हा या व्हायरस सारख्या रोगाला घाबरता कामा नये, या कोरोना सारख्या रोगाचे प्रमुख लक्षणे असलेले सर्दी, खासी, ताप,गळा खवखवणे यासारखे लक्षणे असल्यास स्वतःच्या सुरक्षिततेसाठी व स्वतःच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कोरोना तपासणी चाचणी करून घेता उपचार घेतल्यास अवघ्या काही दिवसात कोरोनाच्या औषधोपचारातुन कोरोना बरा होतो तसेच कोरोना विषाणूचे कुठलेही लक्षण नसल्यास एखादा रुग्ण कोरोना पॉजीटिव्ह आढळल्यास त्याला औषधोपचारासाठी नागपूर ला घरापासुन दूर न पाठवता घरीच विलीगिकरन करून औषधोपचार करता येऊ शकतो तेव्हा नागरिकानो कोरोनाची चाचणी वेळीच करून घ्या , प्रशासनाने दिलेल्या सुरक्षिततेचे काटेकोर नियम पाळा, व कोरोनाचा उपचार संदर्भात कोरोनाचे वेळीच निदान व उपचार केल्यास कोरोना हमखास बरा होतो असे मौलिक प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज कामठी शहरातील हॉट स्पॉट ठरलेले वारीसपुरा, इमलिबाग, न्यागोदाम, कामगार नगर भागातील जनजागृती कार्यक्रमात बोलत होते यावेळी खुद्द जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सदर हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरात व्यक्तीशा पोहोचु न कोरोना विषयो जनजागृती करीत नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी जी प मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, तहसिलदार अरविंद हिंगे, नगर परिषद मुख्याधिकारी जुम्मे प्यारेवाले ,महिला पोलीस उपनिरीक्षक कटारे, नगरसेवक काशिनाथ प्रधान ,नगरसेवक लालसिंग यादव, माजी नगरसेवक मो अर्शद, स्वास्थ्य निरीक्षक गफ्फु मेथीयां, पोलीस कर्मचारी समाधान पांढरे,आदी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी