Advertisement
नागपूर :आयएएस अधिकारी संजय मीना यांची नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज मीना यांनी पदभार स्वीकारला. नागपुरातून मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या जागी संजय मीना यांची नेमणूक करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार राज्य सरकारने राज्यातील १२ वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार या बदल्या करण्यात आल्या.