नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी म्हणून कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली. शहराच्या सीमेवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. यादरम्यान बाहेरून येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी नागपूरसह रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या ५ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजीव कुमार यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली आहे. देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात, तर महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रामुख्याने या लोकसभा निवडणुकांची सुरुवात ही नागपूरसह विदर्भापासून होत आहे.
तसेच निवडणुकीदरम्यान दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा राहणार नाही असेही म्हटले आहे.