मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य करत जागावाटपावरून सध्या महाविकास आघाडीत सुरु असलेल्या वादावर भाष्य केले.
आमच्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासंदर्भात तीनही पक्ष चर्चा करतील. मविआ आणि वंचित अशी संयुक्त बैठक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही. कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी जोपर्यंत आम्ही बोलत नाही, तोपर्यंत आमच्यापैकी कुणीही यावर काही बोलणार नाही,अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
पुढील दोन दिवसांमध्ये संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे दोन नेते आणि वंचितचे नेते एकत्र बैठक घेतील. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि मी प्रत्यक्ष भेटल्यानंतर जागावाटपावर चर्चा करू, असेही ठाकरे म्हणाले. देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे. यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. कोणी कितीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी फरक पडत नाही,असेही ठाकरे म्हणाले.