Published On : Fri, May 23rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

मी भाजपचा नाही तर एनसीपीचा मंत्री ; छगन भुजबळ यांची नागपुरात स्पष्टोक्ती

Advertisement
नागपूर – मी भाजपचा मंत्री नाही, मी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्री आहे,असं स्पष्ट वक्तव्य राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नागपूरमध्ये केलं. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच नागपुरात आलेल्या भुजबल यांनी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका मांडली.

छगन  भुजबळ    म्हणाले की, “सरकार स्थापनेच्या वेळी मला मंत्री करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते. मात्र, तेव्हा पक्षाचा निर्णय झाला आणि मी मंत्री झालो नाही. आता पक्षाच्या निर्णयानुसार मी मंत्री झालो आहे.”

भ्रष्टाचाराच्या आरोपांवर खुलासा-

महाराष्ट्र सदन प्रकरणावर बोलताना  भुजबळ    म्हणाले, “मी महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने ८० पानांचे निकाल देत मला आणि इतर संबंधितांना निर्दोष ठरवले आहे. त्यामुळे आता त्या प्रकरणावर टीका करणे योग्य नाही. महाराष्ट्र सदन तयार आहे, मात्र सरकारने अद्याप त्यासाठी निधी दिलेला नाही.”

ओबीसी समाजासाठी संघर्ष सुरूच-

ओबीसी समाजाबद्दल बोलताना  भुजबळ  म्हणाले, सरकारमध्ये असो वा नसो, ओबीसी समाजासाठी आमचा लढा कायम राहील. मंत्रिपद असल्यामुळे तो लढा अधिक प्रभावीपणे लढता येतो. मी केवळ ओबीसी समाजाचा नाही, तर राज्यातील सर्व नागरिकांचा मंत्री आहे.”

Advertisement

विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर-

विरोधकांकडून होत असलेल्या टीकेबाबत भुजबळ म्हणाले,माझ्यावर टीका करणाऱ्यांना सांगू इच्छितो की मी न्यायालयाच्या आदेशानुसार निर्दोष आहे. आता पुन्हा पुन्हा जुन्या प्रकरणांचे संदर्भ देत बदनामी करणे योग्य नाही.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.