Published On : Tue, Dec 3rd, 2019

हैद्राबाद हत्याकांड प्रकरणाचा कन्हान येथे जाहिर निषेध

कन्हान : – हैदराबाद येथे सामुहिक दुष्कर्म करून २७ वर्षाच्या वेटरनरी डाॅक्टर ला जाळुन मारण्यात आल्याने संपुर्ण देशात आक्रोश व्यकत होत आहे. कन्हान शहर युवा सामाजिक कार्यकर्ता व्दारे हैदराबाद प्रकरणी निषेध करून डॉ प्रियंका रेड्डी ला श्रध्दाजंली अर्पण करून आरोपीना कठोर फाशी शिक्षा देण्याची मागणी निवेदनातुन करण्यात आली.

कन्हान शहर युवा सामाजिक कार्य कर्ता व्दारे तारसा रोड शहिद स्मारक येथे मोमबत्ती लावुन डॉ प्रियंका रेड्डी च्या प्रतिमेला माल्यार्पण करून दोन मिनीट मौन धारण करून भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. हैदराबाद येथील सामुहिक दुष्कर्म करून २७ वर्षाच्या वेटरनरी डाॅक्टर ला जाळुन मारण्याचा जाहिर निषेध केला. तद्नंतर कन्हान शहर युवा सामाजिक कार्यकर्ता ऋृषभ बावनकर यांच्या नेतुत्वात कन्हान ठाणेदार चंद्रकांत काळे यांना भेटुन हैद्राबाद प्रकरणाची चर्चा करून दोषी आरोपीना कठोर फाशीची शिक्षा देण्या ची मागणी निवेदन देऊन करण्यात आली.

याप्रसंगी युवा सामाजिक कार्यक र्ता ऋृषभ बावनकर, प्रवीण गोडे, बाळा उर्फ रंजनिश मेश्राम, धरमेंन्द्र गणवीर, सोनु मसराम, अखिलेश ऊर्फ बाळा मेश्राम, हरीओम प्रकाश नारायण, सोनु खोब्रागड़े, स्वप्निल वाघधरे, अभिजीत चांदुरकर, नितिन मेश्राम, सचिन यादव, चिंटु उर्फ शिवशंकर वाकुडकर, राॅबिन निकोसे, अभिषेक नागरारे, संजय शेंदरे, निलेश आकरे, संदीप देशमुख, सुशिल कमळकर, संजय रंगारी, प्रकाश कुर्वे, अशोक नारनवरे, पियुष वाघधरे, पलाश ऊईके, चंदन मेश्राम, मुकेश गंगराज, अक्षय फुले, शुभम मंदुरकर आदी युवा कार्यक्रर्ता उपस्थित होते.