Published On : Mon, Aug 19th, 2019

कांग्रेस -राष्ट्रवादी चे पदाधिकारी सह शेकडो च्या वर तरुणांचा भाजप प्रवेश

कामठी : राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क मंत्री, नागपूर व वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे याच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून कामठी विधानसभा युवक कांग्रेस चे उपाध्यक्ष विजय कोंडुलवार , सामाजिक कार्यकर्ता राजा बांडेबूचे तसेच कामठी शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी अध्यक्ष उदयसिंग यादव, व माजी नगरसेवक श्रावण केळझकर , यांच्यासह शेकडो च्या वर तरुणांनी पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत केले

भाजप पक्ष प्रवेश कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ,भाजप हा घराणेशाहीचा पक्ष नसून समाजातील सर्व सामान्य नागरिकांना घेऊन चालणारा एकमेव पक्ष असून, चहा विकणाऱ्या सर्वसामान्य कार्यकरता नरेंद्र मोदी यांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करणारा एकमेव भाजप पक्ष आहे भाजप पक्षात कोणताही धर्म जातीभेद होत नसून समाजातील सर्वांचा शेवटच्या नागरिकांचा सर्वांगीण विकास हा एकमेव उद्देश आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या नेतृत्वात पक्ष प्रगती करत आहे

भाजप पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्यातील विविध योजना समाजातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचून पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाला उद्योगपती अजय अग्रवाल, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष रंजीत सफेलकर ,प्रा मनीष बाजपेयी, शहर भाजपाध्यक्ष विवेक मगतानी ,कामठी विधानसभा क्षेत्राचे विस्तारक मनोज चौरे ,माजी जी प सदस्य अनिल निधान , लाला खंडेलवाल, अशोक झाडे ,श्रीकांत शेंद्रे ,नगरसेवक सुषमा सीलाम ,लालसिंग यादव, प्रतीक पडोळे, संध्या रायबोले, पिंकी वैद्य, रमेश वैद्य, डॉ महेश महाजन, अरुण पोटभरे ,कमल यादव डॉ संदीप कश्यप, सुनील सीलांम, उज्वल रायबोले , बाल्या सपाटे, सतीश जैस्वाल आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक झाडे यांनी केले संचालन कपिल गायधने यांनी केले व आभार प्रदर्शन लाला खंडेलवाल यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी