Published On : Mon, Aug 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

हुडकेश्वर पोलिसांची कामगिर;उधारी फेडणे टाळण्यासाठी रचली बनावट लुटीची कहाणी

Advertisement

Auto Draft

नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार आणि रोख रक्कम लुटल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, तपासात ही लूट पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले. मित्राकडून घेतलेली सुमारे दोन लाख रुपयांची उधारी परत करावी लागू नये, यासाठी तक्रारदारानेच बनावट लुटीचा कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

त्रिमूर्तीनगर येथील अमोल संतोष धर्नेजा याने कॅफे सुरू करण्यासाठी मित्र अवतारसिंग महेंद्रसिंग धुन्ना याच्याकडून सुमारे दोन लाख रुपये उधार घेतले होते. मित्राकडून पैशांची वारंवार मागणी होत असताना उधारी फेडण्याचे टाळण्यासाठी अमोलने बनावट लुटीची योजना आखली.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

२२ ऑगस्ट रोजी अमोलने हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार दाखल करताना पिरॅमिड सिटी परिसरातून कारने जात असताना एका अनोळखी व्यक्तीने लिफ्ट मागितल्याचे सांगितले. काही अंतरावर त्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवत मारहाण केली आणि कार घेऊन फरार झाल्याचा दावा त्याने केला. कारमध्ये दोन लाख पाच हजार रुपये रोख असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

मात्र, तपासादरम्यान अमोलच्या जबाबात वारंवार विसंगती आढळून आल्या. घटनास्थळाची पाहणी, मोबाईलचे स्थान आणि इतर तांत्रिक पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर पोलिसांना लुटीची घटना संशयास्पद वाटू लागली.

Advertisement

पोलिसांनी कसून चौकशी केली असता अमोलने अखेर बनावट लुटीचे सत्य कबूल केले. मित्राची दोन लाख रुपयांची उधारी फेडण्यास वेळ मिळावा आणि पैशांची परतफेड टाळता यावी, यासाठी त्याने हा बनाव रचल्याचे समोर आले.

पोलिसांची दिशाभूल करून खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी अमोलविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया हुडकेश्वर पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.