Published On : Tue, Dec 17th, 2019

एचएससी व्होकेशनल अभ्यासक्रमातील शिक्षकांना ४६०० ग्रेड पे द्या

नागपूर/ १७ डिसेंबर : राज्य शासनाने एचएससी व्होकेशनल आणि द्विलक्षी अभ्यासक्रमातील पूर्णवेळ शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार ४६००/- ग्रेड पे मंजूर करावा, अशी मागणी व्होकेशनल इन्स्ट्रक्टर्स टिचर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

याकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेतर्फे मंगळवारी विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता.

Advertisement

शासनाच्या कौशल्यविकास आणि उद्योजकता विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील २ स्तरावरील आधारित एचएससी व्होकेशनल आणि द्विलक्षी अभ्यासक्रमांकडील पूर्ण वेळ शिक्षकांच्या समस्या प्रलंबित आहेत.

Advertisement

‘प्लस-२’ स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रमांचे रुपांतरण आणि निरीक्षण रद्द करण्यात यावे, अशीही संघटनेची मागणी आहे.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement