Published On : Tue, May 28th, 2019

बारावीचा राज्याचा निकाल 85.88 टक्के; कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी

बारावीचा बोर्डाचा निकाल आज दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 85.88 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2.53 टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे ही प्रेस काॅन्फरन्स यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येईल.

Gold Rate
May 04- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,400 /-
Gold 22 KT ₹ 1,39,900 /-
Silver/Kg ₹ 2,47,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोकण अव्वल, नागपूर तळाला

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. यात कोकण विभागाचा सर्वाधिक 93.23 टक्के निकाल लागला आहे. तर 82.81 टक्क्यांसह नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे.

यंदाही मुलींची बाजी

निकालाच्या बाबतीत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 90.25 टक्के आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल 82.40 टक्के आहे. यावर्षी विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 7.85 टक्क्यांनी जास्त आहे.

संपूर्ण राज्यात 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. मुंबईच्या सोफिया काॅलेजची विद्यार्थिनी निशीका ही iPad वर परीक्षा देणारी पहिलीच दिव्यांग विद्यार्थिनी ठरली होती. ती 73 टक्क्यांनी उत्तीर्ण झाली आहे.

बारावीचा विभागनिहाय निकाल

पुणे – 87.88 टक्के
मुंबई – 83.85 टक्के
नागपूर – 82.81 टक्के
अमरावती – 87 टक्के
लातूर – 86.08 टक्के
नाशिक – 84.77 टक्के
औरंगाबाद – 87.29 टक्के
कोल्हापूर – 87.12 टक्के
कोकण – 93.23टक्के

शाखानिहाय निकाल

कला – 76.45 टक्के
वाणिज्य – 88.28 टक्के
विज्ञान – 92.60 टक्के

बारावी निकालाची वैशिष्ट्ये

* कोकण अव्वल (93.23 टक्के), नागपूर तळाला (82.81)
* 90.25 टक्क्यांसह विद्यार्थिनींची बाजी (यंदा 7.85 टक्के जास्त निकाल)
* राज्यात 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण, मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत घट
* iPad वर परीक्षा देणाऱ्या मुंबईतील दिव्यांग विद्यार्थिनीला 73 टक्के
* दिव्यांगांच्या निकालात यंदा 1.18 टक्क्यांनी वाढ (यावर्षी 92.60 टक्के निकाल)

कसा पाहाल निकाल?

बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement