Published On : Thu, Jun 3rd, 2021

HSC exams Cancelled : अखेर शिक्कामोर्तब, बारावीची परीक्षा रद्द!

Advertisement

मुंबई : अखेर बारावीची परीक्षा रद्द (Maharashtra HSC exam Cancelled) करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (Maharashtra Board) शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा (Maharashtra HSC exam cancelled) अधिकृतपणे रद्द झाल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कालच बारावी परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवल्याचं सांगितलं होतं. शिवाय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा रद्द करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली होती. (Maharashtra class 12 board exam 2021 cancelled by Uddhav Thackeray govt after cabinet decision today HSC exam cancelled after CBSE exam)

याबाबत माहिती देताना काल वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या, “बारावीच्या परीक्षांसदर्भातील परिस्थिती आम्ही मंत्रिमंडळासमोर मांडली आहे. आमचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक दोन दिवसांमध्ये होईल. त्यानंतर त्यांची परवानगी आली की आम्ही परीक्षेबाबत निर्णय जाहीर करू