Advertisement
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र आता मोदी सरकारकडून गृहिणींसाठी आनंदवार्ता आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मोदी सरकार स्वस्त एलपीजी सिलिंडरची भेट देऊ शकते. स्वयंपाकाच्या गॅसची किंमत सुमारे २०० रुपयांनी कमी होऊ शकतात,अशी माहिती समोर येत आहे.
देशात १४.२ किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात अखेरचा बदल १ मार्च २०२३ रोजी करण्यात आला होता, तर त्याआधी जुलै २०२२ मध्ये एलपीजीच्या किमतीत बदल करण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्याने सर्वसामान्य विशेषतः गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.