Published On : Fri, Sep 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

होम इन्शुरन्स घेणं का गरजेचं आहे?

आपलं घर कितीही छोटं असलं तरी ते खास असतं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं घर नक्की असावं. म्हणून लोक खूप मेहनत करतात, घर बांधतात किंवा होम लोन घेतात. नंतर आयुष्यभर EMI भरावी लागते. जर EMI वेळेवर भरली नाही तर तणाव वाढतोच. त्यावर काही तुटफूट झाली किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान म्हणजे डोक्यालं ताप. अशा परिस्थितीत, होम इन्शुरन्स घेऊन तुम्ही तुमच्या घराचं आणि त्यातल्या मोलाच्या वस्तूंचं संरक्षण करू शकता.

होम इन्शुरन्स म्हणजे काय?

होम इन्शुरन्स ही अशी पॉलिसी आहे जी तुमच्या घराचं आणि घरातील सामानाचं नुकसान किंवा चोरीपासून संरक्षण करते. ही पॉलिसी स्वतःच्या घरासाठी तसेच भाड्याच्या घरासाठीही लागू होते. जर घरात चोरी झाली, आग लागली, स्फोट झाला किंवा नैसर्गिक आपत्ती जसे की बाढ किंवा भूकंपामुळे नुकसान झाले, तर होम इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या या नुकसानाची भरपाई करते. विमा कंपनी तुमच्या घराचा किंवा सामानाचा खर्च भरते, ज्यामुळे तुमचं आर्थिक ताण कमी होतो.

 

होम इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कव्हरेजचे प्रकार

होम इन्शुरन्सचे मुख्यतः ३ प्रकार असतात-

Gold Rate
26 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,400 /-
Gold 22 KT ₹ 1,06,400 /-
Silver/Kg ₹ 1,38,100/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
  • ओन्ली कंटेंट कव्हरेज – ही पॉलिसी फक्त घरातील सामानासाठी लागू होते, जसे की इलेक्ट्रिकल आयटम्स, फर्निचर आणि इतर घरगुती वस्तू.
  • ओन्ली बिल्डिंग कव्हरेज – ही पॉलिसी फक्त घराची भिंती, छप्पर यांसारख्या भागांच्या नुकसानासाठी असते. जर काही नुकसान झाले तर रिपेअर किंवा पुन्हा बांधण्यासाठी लागणारा खर्च कव्हर होतो.
  • बिल्डिंग आणि कंटेंट कव्हरेज – या कव्हरेजमध्ये घराची इमारत आणि घरातील सामान, दोन्ही सुरक्षित राहतात. घर किंवा सामानाला काही धोका झाला तरी तुम्ही पूर्ण संरक्षण मिळवता.

होम इन्शुरन्स का घ्यावा?

घर आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं असतं, मग त्याचा इन्शुरन्स करणं अजून जास्त गरजेचं ठरतं. होम इन्शुरन्स घेण्यामागची मुख्य कारणं अशी आहेत –

  1. नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण – भारतात बाढ, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक घरांना नुकसान होतं. या वर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे खूप नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत होम इन्शुरन्स सर्वात आधी घ्यावा, कारण यातून तुमच्या प्रॉपर्टीला झालेल्या नुकसानाची भरपाई विमा कंपनी करते.
  2. चोरी आणि लुटपाट पासून संरक्षण – होम इन्शुरन्समध्ये घरातील सामानाचा देखील समावेश असतो. कीमती वस्तू जसे की दागिने, टीव्ही, मशीन इत्यादी चोरी झाल्यास होणारा आर्थिक फटका भरपाई करण्यास ही पॉलिसी मदत करते.
  3. जबाबदारीपासून संरक्षण (Liability Protection) – जर तुमच्या घरामुळे इतरांनाही काही नुकसान झाले, तर त्याची भरपाई विमा कंपनी करते. घराशी संबंधित शेजाऱ्याशी तणाव किंवा घराच्या कॉन्ट्रॅक्टशी संबंधित समस्या असो, होम इन्शुरन्स तुम्हाला कायदेशीर मदत आणि आर्थिक संरक्षण देते.
  4. रिपेअर आणि रिप्लेसमेंटचा खर्च – घरातील कोणतीही वस्तू खराब किंवा चोरी झाली, तर होम इन्शुरन्स तिच्या रिपेअर किंवा बदलण्याचा खर्च सांभाळते.
  5. लोन अगेंस्ट प्रॉपर्टी – होम लोन घेताना बँक किंवा फाइनेंशियल संस्था अनेकदा इन्शुरन्स घेण्याची शिफारस करतात. यामुळे केवळ तुमच्या घराचं संरक्षण होत नाही तर बँकेच्या हिताचंही रक्षण होतं.
  6. थर्ड-पार्टी जबाबदारी- जर तुमच्या घरातल्या परिसरात एखाद्या व्यक्तीला इजा झाली, तर होम इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला कायदेशीर जबाबदारी आणि थर्ड-पार्टी क्लेम पासून सुरक्षित ठेवते.
  7. अस्थायी राहण्याची सोय – जर घर नुकसानीमुळे राहण्यायोग्य नसेल, तर अस्थायी निवासाचा खर्चही या पॉलिसीने कव्हर केला जातो.
  8. किफायती प्रीमियम – होम इन्शुरन्सचे प्रीमियम खूप परवडणारे आहेत. वेगवेगळ्या बजेटनुसार अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, फ्लेक्सिबल पेमेंट ऑप्शन्समुळे तुम्ही प्रीमियम मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक पद्धतीने भरू शकता.
  9. मालमत्तेची रीसॅल व्हॅल्यू वाढवते – होम इन्शुरन्स असलेले घर खरेदीदारांना जास्त आकर्षक वाटते. यामुळे तुमच्या घराची रीसॅल व्हॅल्यू सुधारते।
  10. मनःशांती- सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनःशांती. घराला काही नुकसान झालं, तरी तुमच्या डोक्यावर इतका मोठा आर्थिक ताण येणार नाही याची खात्री असते. विमा कंपनी सर्व खर्च सांभाळते, त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिर राहता.

होम इन्शुरन्ससाठी पात्रता

होम इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी साधारण या अटी असतात:

  1. तुम्ही घरमालक किंवा घरात राहणारे व्यक्ती असायला हवेत.
  • घरमालक – स्वतःच्या घराचे मालक असाल तर तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकता.
  • भाडेकरू – भाड्याच्या घरात ठेवलेल्या फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने अशा सामानासाठी भाडेकरू देखील इन्शुरन्स घेऊ शकतो.
  • हाउसिंग सोसायटीचे सदस्य – सोसायटीच्या सामूहिक प्रॉपर्टीसाठी (जसे की पार्किंग एरिया, गेट, बाग) विमा घेण्याची सुविधा असते.
  1. भारतीय रहिवासी असणे गरजेचे आहे.
  2. प्रॉपर्टीची स्थिती –
  • पक्कं घर असणं आवश्यक आहे.
  • घर पूर्ण बांधलेलं असावं.
  • फक्त जमीन किंवा प्लॉटसाठी होम इन्शुरन्स मिळत नाही.
  • जर घर आणि दुकान एकत्र असेल तर पॉलिसीच्या अटी वेगळ्या लागू होऊ शकतात. शॉप इन्शुरन्स वेगळं असतं.
  1. याशिवाय, प्रॉपर्टीचं स्थान, त्याचं मेंटेनेंस आणि तुमची क्रेडिट हिस्ट्री यावरही वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांचे स्वतःचे नियम असू शकतात.

कोणते फॅक्टर्स ठरवतात तुमच्या होम इन्शुरन्सचा प्रीमियम?

होम इन्शुरन्सचा प्रीमियम प्रत्येकासाठी सारखा नसतो. तो अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. या गोष्टींवरून इन्शुरन्स कंपनी ठरवते की तुमच्या घराला कव्हर देण्यात किती रिस्क आहे. चला जाणून घेऊ या महत्वाचे फॅक्टर्स:

  1. घराचा प्रकार- जर घर तुमचं स्वतःचं असेल तर तुम्हाला बिल्डिंग आणि घरातल्या सामानाचं (कंटेन्ट) दोन्ही कव्हर मिळतं. पण जर घर भाड्याचं असेल तर फक्त सामानाचं कव्हर मिळतं. त्याशिवाय घर फ्लॅट आहे, डुप्लेक्स आहे की बंगला आहे, यावरही प्रीमियम अवलंबून असतो. घरातली फर्निशिंग आणि इंटीरियरची क्वालिटीही यात धरली जाते.
  2. लोकेशन आणि रिस्क फॅक्टर- घर कोणत्या भागात आहे हे खूप महत्वाचं असतं. जर घर सुरक्षित सोसायटीमध्ये असेल तर चोरी, पूर किंवा आगीसारखा धोका कमी असतो आणि प्रीमियमही कमी लागू शकतो. पण ज्या भागात वारंवार नैसर्गिक आपत्ती किंवा गुन्हेगारी घडतात तिथे प्रीमियम जास्त लागतो.
  3. घराचं वय- घर जितकं जुनं असेल तितकं त्याला नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. भिंती, छत किंवा स्ट्रक्चरची मजबुती काळानुसार कमी होत जाते. त्यामुळे घर जुने असेल तर प्रीमियम जास्त लागतो.
  4. घराचा आकार- लोकेशनप्रमाणे घराचा साइजदेखील महत्वाचा असतो. मोठं घर असल्यास त्याचा कव्हरेज भाग जास्त होतो आणि त्यानुसार प्रीमियमची रक्कमही वाढते.
  5. घरातील सामान- घरात ठेवलेल्या वस्तू जसं दागिने, महागडे गॅजेट्स, शोपीसेस वगैरे किती किमतीचे आहेत यावरून प्रीमियमची रक्कम ठरवली जाते.
  6. सुरक्षा उपाय- जसं हेल्थ इन्शुरन्समध्ये चांगल्या आरोग्यावर काही सवलत मिळते, तसंच घरात सुरक्षा सिस्टम (सिक्युरिटी सिस्टम, फायर अलार्म, CCTV इ.) असल्यास होम इन्शुरन्सवर डिस्काउंट मिळू शकतो.
  7. अतिरिक्त कव्हर- जर बेसिक पॉलिसीपेक्षा कव्हरेज वाढवायचं असेल तर वेगवेगळे अ‍ॅड-ऑन्स घेता येतात. उदा. सीवरेज वॉटर बॅकअप कव्हर, पेस्ट कंट्रोल कव्हर, टेररिझम कव्हर इत्यादी. हे अ‍ॅड-ऑन्स प्रत्येक कंपनीनुसार बदलतात.

होम इन्शुरन्ससासाठी आवश्यक कागदपत्रं

होम इन्शुरन्स पॉलिसी घेताना साधारणपणे ही कागदपत्रं द्यावी लागतात –

  • ओळखपत्र – जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इ.
  • पत्त्याचा पुरावा – जसं की वीज बिल, रेशन कार्ड, बँकेचं स्टेटमेंट इ.
  • मालकीचा पुरावा – सेल डीड, कन्व्हेअन्स डीड किंवा रजिस्टर्ड टायटल डीड.

याशिवाय काही कंपन्या अजून कागदपत्रं मागू शकतात, जसं –

  • प्रॉपर्टी टॅक्सची पावती
  • बँक अकाऊंटची माहिती
  • आधी कधी इन्शुरन्स क्लेम केला असेल तर त्याचा रेकॉर्ड

निष्कर्ष

हे सांगायची खरं तर गरज नाही की घर आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. पण आजकाल लोखंड, सिमेंट आणि वाळू यांचे दर इतके वाढले आहेत की घराचं नुकसान झालं तर त्याची दुरुस्ती करणं सोपं राहत नाही. कुठलीही नैसर्गिक आपत्ती किंवा अपघात झाला तर प्रत्येक वेळी सरकारकडून मदत मिळेलच असं नाही. खरं तर, आपल्या घराची सुरक्षितता ही जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते. म्हणूनच होम इन्शुरन्स घेणं खूप महत्वाचं आहे. कारण घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात, तर तिथेच आपलं खरं सुख, समाधान आणि सुरक्षितता दडलेली असते.

Advertisement
Advertisement