Published On : Thu, Jun 18th, 2015

नागपूर : विरांगणा झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी निमित्त मनपा तर्फे अभिवादन

Rani LaxmiBai Punytithi News Photo 18 June 2015
नागपूर। विरांगणा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांनी झाशी राणी चौक सिताबर्डी स्थित राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला सकाळी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी अहिल्या मंदिराच्या विद्यार्थिनींनी गीत सादर केले.

या प्रसंगी कर्हाडे, ब्राम्हण संघ नागपूर चे उपाध्यक्ष आनंद पराडकर, ऋत्विक सुभेदार, धनंजय डेग्वेकर, अरुण पळसुले, श्रीरंग माईणकर, मनीष नवाथे, अविनाश जावडेकर, राणी लक्ष्मी भगिनी मंडळाच्या अल्का चंदेल, रोहिणीताई उधोजी, छायाताई गाडे, भावना खरे आदी उपस्थित होते.