Published On : Mon, Jan 27th, 2020

दुर्गा नगर मनपा शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम

नागपूर: दुर्गा नगर भागातील मनपा शाळेत रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शालेय विद्यार्थिनी अंजली समर्थ हिच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला.

कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून नगरसेवक अभय गोटेकर, सामाजिक कार्यकर्त्या नसरीन, अनिस गुढे, शाळेच्या मुख्याध्यापिका शीला अथिलकर, ममता कुदरे, सक्सेना, नगरसेविका रूपा ठाकुर, अस्मीता पोयाम, पालक समिती सदस्य कावळे आणि बोबडे उपस्थित होते. स्काउट गाइडच्या विद्यार्थ्यांतर्फे पथसंचलन सादर करण्यात आले. यानंतर मुख्य अतिथींचा सत्कार पार पडला. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते आणि नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. गोटेकर यांनी त्यांच्या भाषणातून दुर्गा नगर मनपा शाळेला सीबीएसई पॅटर्न अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उजवणे यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोग आणि कुष्ठरोग सतर्कतेबाबत शपथ दिली. आयोजनात शिक्षण सप्ताहातील क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी नसरीन यांच्यातर्फे विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक श्याम गोहोकर आणि संचालन प्रिती पांडे यांनी केले. आभार भारती गजाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा उजवणे, श्रीकांत गडकरी, सूरज तंदूरे, सुनील डोईफोडे आणि सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement