
चंद्रपुर : महानगरपालिकेतील महिला व बालकल्याण समिती तसेच झोन समित्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाची अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. या परिस्थितीचा थेट लाभ काँग्रेसला झाला असून मनपात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या संगीता भोयर यांनी विजय मिळवला. १२ सदस्यीय समितीत भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी ६-६ सदस्य होते. मात्र शिवसेना (शिंदे गट)च्या डीलन केलझरकर या मतदानावेळी अनुपस्थित राहिल्याने संपूर्ण गणित बदलले. परिणामी भोयर यांना ६ मते मिळाली, तर भाजपाच्या सुनीता जायसवाल यांना केवळ ५ मतांवर समाधान मानावे लागले.
केलझरकर मतदानात सहभागी झाल्या असत्या, तर सामना ६-६ असा बरोबरीत राहून ‘ईश्वर चिट्ठी’द्वारे निर्णय घ्यावा लागला असता. सूत्रांच्या माहितीनुसार, केलझरकर यांना सभापतीपदाचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र भाजपाने ऐनवेळी सुनीता जायसवाल यांना उमेदवारी दिल्याने नाराज होऊन त्यांनी मतदान टाळले.
दरम्यान, झोन क्रमांक २ आणि ३ मधील निवडणुकांमध्ये भाजपाने अचानक माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. झोन २ मधून ज्योती जीवने, तर झोन ३ मधून जितेश कुलमेथे यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेतली. हा निर्णय भाजपातील सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार गटांतील वादाचे परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
प्रदेश कार्यालयाकडून झोन १ साठी रवी लोणकर आणि महिला व बालकल्याण समितीसाठी सुनीता जायसवाल यांची नावे पाठवण्यात आली होती. हे दोघेही मुनगंटीवार समर्थक मानले जातात. त्यामुळे जोरगेवार गटातील नगरसेवक नाराज झाले आणि त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.
या घडामोडींमुळे झोन २ मधून काँग्रेसच्या वैशाली चंदनखेडे यांची बिनविरोध निवड झाली, तर झोन ३ मधून काँग्रेसचे रामनरेश यादव विजयी ठरले.
विशेष म्हणजे, झोन ३ मध्ये स्पष्ट बहुमत असूनही भाजपाला माघार घ्यावी लागल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या सर्व घटनांमुळे चंद्रपुर मनपातील सत्ताधारी भाजपाची अडचण वाढली असून, आगामी काळात याचे राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate
कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime
GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की...
मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews
शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews...







