
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी गावचा सुपुत्र आणि भारतीय सैन्यात कार्यरत असलेला जवान रोहित परशुराम खन्नीकुडे (वय २७) यांचा जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला. १६ एप्रिलच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रोहित यांनी २०२० साली मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती होऊन देशसेवेची वाट धरली होती. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अरुणाचल प्रदेश तसेच चीन सीमावर्ती भागातही सेवा बजावली होती. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये नियुक्ती असताना एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
रोहित यांचे पार्थिव रविवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार असून, शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या वेळी लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार असून मानवंदनाही दिली जाईल.
साध्या शेतकरी कुटुंबात वाढलेल्या रोहित यांनी गावातच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न त्यांनी मेहनतीच्या जोरावर साकार केले. त्यांच्या या कार्यामुळे गावात अभिमानाचे वातावरण होते.
त्यांच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी देशासाठी त्याने दिलेल्या बलिदानाचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने खन्नीकुडे कुटुंबीयांना धीर दिला.
रोहित खन्नीकुडे यांच्या बलिदानाने कोल्हापूर जिल्ह्याची देशभक्तीची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, त्यांच्या स्मृतीला सर्वत्र आदरांजली वाहिली जात आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY




