Published On : Mon, Feb 3rd, 2020

हिंगणघाट : प्राध्यापिका युवती चे अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळन्याचा प्रयत्न

कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुणीला भरचौकात तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळल्याची धक्कादायक घटना वर्धाजिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात घडली. या तरुणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. आरोपीने हे कृत्य केल्यानंतर तो तिथून तत्काळ पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे हिंगणघाटमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पीडित तरुणी एका महाविद्यालयात शिक्षिका असल्याचे समजते. नेहमी प्रमाणे ती कामावर जाण्यासाठी लगबगीने घराबाहेर निघाली. आरोपी तिच्या मागावरच होता. जशी ही तरूणी हिंगणघाटातील नंदेरी चौकात पोहोचली, तसे संधी साधून आरोपीने सोबत आणलेले आणि पेट्रोल तिच्या अंगावर टाकले आणि तिला पेटवून दिले. त्यानंतर जराही न थांबता हा आरोपी तिथून फरार झाला. आरडोओरडा ऐकून आजुबाजूच्या लोकांनी तातडीने पीडित तरुणीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या तरुणीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.

हा धक्कादायक प्रकार नेमका कशामुळे घडला, आरोपी आणि तरूणी एकमेकांना ओळखत होते का, याचा पोलीस शोध घेत आहेत.