Published On : Mon, Feb 10th, 2020

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू

Advertisement

हिंगणघाट येथे भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. आज सकाळी ७ च्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला.

गेल्या ७ दिवसांपासून पीडितेवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी तिच्यावर चौथी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, सुरू असलेल्या औषधोपचारांना तरुणीकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. तरुणीच्या शरीरातील प्राणवायुचे घटते प्रमाण काळजीची बाब झाली होती. रविवारी मध्यरात्रीासून पीडितेची प्रकृती अत्यंत खालावली. पीडितेचे ब्लड प्रेशर हळूहळू कमी होत गेल्यानंतर सकाळी तिला दोनवेळा हृदयविकाराचा झटका आला. त्यात सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील अधिकारी डॉ. दर्शन रेवनवार यांनी दिला.

Gold Rate
09 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,28,000 /-
Gold 22 KT ₹ 1,19,000 /-
Silver/Kg ₹ 1,79,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पीडित तरुणीच्या शरीराचा ३५ टक्क्यांहून अधिक भाग भाजला होता. तिच्या कमरेच्या वरील भाग आगीमुळे भाजल्याने श्वासनलिका, अन्ननलिकादेखील भाजून निघाली होती. त्यामुळे ही तरुणी सध्या जंतुसंसर्गाशी झुंज देत होती. तिला ८० टक्के कृत्रिम श्वासोच्छ‌वास प्रणालीवर ठेवण्यात आले होते.

Advertisement
Advertisement