Published On : Wed, May 9th, 2018

क्लस्टर विद्यापीठाला बळकटी देण्यासाठी तीन क्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाकडे पाठविणार – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे

मुंबई: महाराष्ट्रातील शैक्षणिक गुणवत्ता अधिक वाढविण्याच्या दृष्टीने रुसाच्या माध्यमातून महाराष्ट्रात क्लस्टर विद्यापीठाला बळकटी देण्याच्या दृष्टीने तीन क्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मार्फत राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) कडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.

प्रस्तावित तीन क्लस्टर विद्यापीठांच्या प्रस्तावामध्ये एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, केसी कॉलेज आणि बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज (बीटीटीसी) या महाविद्यालयांचे एक क्लस्टर विद्यापीठ तर के. जे. सोमैय्या कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्स, के.जे. सोमैय्या कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड कॉमर्स, एस. के. सोमैय्या कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स या तीन महाविद्यालयांचे दुसरे क्लस्टर विद्यापीठ तसेच एल्फिन्स्टन कॉलेज, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स, शासकीय बीएड् कॉलेज या शासकीय महाविद्यालयांचे तिसरे क्लस्टर विद्यापीठ असे तीन क्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव रुसाकडे पाठविण्यात येणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.तावडे यांनी सांगितले.

Advertisement

राष्ट्रीय उच्चस्तरीय शिक्षा अभियान (रुसा) च्या महाराष्ट्र राज्य रुसा कौन्सिलची बैठक आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला रुसाच्या राज्य प्रकल्प संचालक मीता राजीवलोचन यांच्यासह रुसा कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते.

Advertisement

उपरोक्त तिनही क्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर येथे कार्यरत प्राध्यापकांचे अनुदान हे शासनामार्फतच सुरु राहणार असे स्पष्ट करतानाच श्री.तावडे यांनी सांगितले, या क्लस्टर विद्यापीठांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अधिक सुधारणा होईल, तसेच विद्यार्थ्यांना चॉईस बेस्ड क्रेडीट सिस्टिमचाही लाभ मिळू शकेल, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम निवडण्यासाठी अधिक उत्तम पर्याय उपलब्ध होऊ शकतील, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

रुसाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय महाविद्यालये आणि विद्यापीठ यांना अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने तसेच शैक्षणिक गुणवत्ता अधिक दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या विद्यापीठांना आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी रुसा प्रयत्न करीत आहेत, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

रुसाच्या आजच्या राज्य बैठकीत महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये संशोधन, नाविन्यपूर्ण व उच्च शिक्षणासाठी प्रस्ताव देण्यात आले आहेत, तसेच नॅक मुल्यांकनासाठी रुसांतर्गत सहाय्यता कक्षाची निर्मिती करण्याचा विचारही या बैठकीत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या अधिक क्षमता विकासासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement