Published On : Sun, Apr 16th, 2017

मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद विमानतळांवर हायअलर्ट, विमान उडविण्याची धमकी

Advertisement


मुंबई (Mumbai) :
मुंबई (Mumbai), चेन्नई (Chennai) आणि हैदराबाद (Hyderabad) या महत्त्वाच्या विमानतळांवर हायअलर्ट घोषीत करण्यात आला आहे. तसेच येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. विमानाचे अपहरण केले जाणार असल्याचा कट शिजत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

मुंबई पोलिसांना आलेल्या एका ईमेलने एकच खळबळ उडाली आहे. विमान हायजॅकबाबतचा हा ईमेल आहे. मुंबई पोलीस उपायुक्तांना एका महिलेकडून ईमेल आला. मुंबई पोलीस उपायुक्त यांना अज्ञात महिलेकडून हा ईमेल आला आहे. या ईमेलला गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी मुंबई विमानतळाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्याबरोबर मुंबई (Mumbai), चेन्नई (Chennai) आणि हैदराबाद (Hyderabad) विमानतळांवर हायअलर्ट जारी करण्यात आले आहे आणि सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

सुरक्षा दलाचा दुजोरा
दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) चे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी या तीन विमानतळांवर हाय अलर्ट जारी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तो मेल फसवणूक करणाराही असू शकतो पण खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे, अशी माहिती सिंग यांनी दिली.

काय म्हटल आहे ईमेलमध्ये ?
या महिलेच्या ईमेलनुसार, मुंबई (Mumbai), चेन्नई (Chennai) आणि हैदराबाद (Hyderabad) येथून विमान हायजॅक करण्याबाबत तीन व्यक्ती विमानतळावर बोलत होते. या ईमेलमध्ये एकाच वेळी मुंबई (Mumbai), चेन्नई (Chennai) आणि हैदराबाद (Hyderabad) विमानतळावर विमानांचे अपहरण करण्याचा कट शिजवला जात असल्याचं तिने म्हटलं. 6 मुलांना यासंबंधी कट शिजवताना ऐकलं असं त्या महिलेने मेलमध्ये म्हटलं आहे.