Published On : Mon, May 10th, 2021

रामटेक नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी हर्षल गायकवाड रूज

प्रलंबित कामाचा होणार निपटारा- मुख्याधिकारी हर्षल गायकवाड

रामटेक– सर्वात आधी लातूर येथे महानगर पालिका उपायुक्त पदावर रुजू नंतर यवतमाळ येथे जिल्हा प्रशासन अधिकारीपदी कार्यरत असलेले हर्षल गायकवाड यांनी नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई येथील अपर सचिव यांनी ३ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार नगर परिषद, रामटेक येथे रूजू होऊन शुक्रवार, ७ मे रोजी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.

Advertisement

मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांची बदली झाल्यावर पारशिवनी नगर पंचायतच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्याकडे या पदाचा कार्यभार होता. त्यांनी विकासकामे आणि कोरोनाच्या काळातील परिस्थिती सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने अनेक कामात अडथळा निर्माण होऊन ते प्रलंबित राहतात, अशी चर्चा बराच काळ सुरू होती.

कोरोना काळात विविध प्रकारच्या उपाययोजना करताना त्या तातडीने करता येतील, तसेच प्रलंबित विकासकामानांही गती प्राप्त होईल.
असे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी सांगितले..

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement