Published On : Sat, Nov 5th, 2022
By Nagpur Today Nagpur News

‘सिकलसेल वारियर्स’च्या हेल्पलाईन सेवांना प्रारंभ

Advertisement

स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम
सिकलसेल ग्रस्तांसाठी मुख्यालयात औषधांचा पुरवठा

वंचित घटकांमध्ये सर्वाधिक आढणारा सिकलसेल आजार हा आनुवांशिक रक्तदोशातून होत असतो. नागपूरसह विदर्भात सर्वाधिक आढळणाऱ्या या आजाराबाबत ‘सिकलसेल वारिर्यस’ यांना दररोज तोंड द्यावे लागत आहे. स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे सिकलसेल रुग्णांच्या समस्यांचे निराकारण व्हावे या हेतूने स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे ‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ या अभियानाअंतर्गत 8208353222 हेल्पलाईनची सुरूवात करण्यात आली आहे, अशी माहिती ट्रस्टच्या उपाध्यक्षा लिना तामगाडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दुर्धर मानल्या जाणाऱ्या सिकलसेल ग्रस्त रुग्णांच्या औषधांसह रक्ताची जमवाजमव करण्यास अनेक अडचणींचा सामना आज करावा लागत आहे. सिकलसेलसारख्या दीर्घकालीन आजाराचे निदान लवकर झाल्यास त्यावर औषधोपचार करून नियंत्रण मिळवणे सोपे जाते. हे लक्षात घेऊनच ट्रस्टद्वारे फक्त सिकलसेल रूग्णांसाठी विदर्भातील पहिली फार्मसी तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट मुख्यालयात उघडली आहे. जयवंत नगर येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी, प्राचार्य अरूणराव कलोडे महाविद्यालयाजवळील ट्रस्ट मुख्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या फार्मसीमध्ये सिकलसेल ग्रस्तांना मुबलक दरात औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे, असेही लिना तामगाडगे यांनी सांगितले. ट्रस्टच्या उपाध्यक्षा लिना तामगाडगे यांनी सांगितले की, ‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत रूग्णांना समुपदेशन तसेच इतर सर्व प्रकारची माहिती एकाच वेळी मिळावी या हेतूने तामगाडगे ट्रस्ट डाॅट काॅम या वेबसाईटवरही ‘सिकलसेल वारियर्स’ यांना मार्गदर्षन मिळवता येणार. तसेच सिकलसेलची साखळी तोडण्यास हातभार लावण्यासाठी या वेबसाईटवर रूग्णांना आपली नोंदणी केल्यास औशधांची उपलब्धता कश्या प्रकारे करण्यात येणार यावरही माहिती मिळवता येणार. मुख्यालयातील फार्मसी ही सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत उपलब्ध राहणार असेही, ट्रस्टच्या उपाध्यक्षा लिना तामगाडगे यांनी सांगितले.

तामगाडगे ट्रस्ट डाॅट काॅम वेबसाईटवर नोंदणी करा
विशिष्ट समुदायातील अनुवंशिक आजार अशी ओळख असलेल्या सिकलसेल आजार हा हिमोग्लोबीमुळे लाल रक्त पेशींद्वारे आकार बदलल्यानंतर होत असतो. दुर्धर असलेल्या सिकलसेलबाबत मोठयांना थोडीफार माहिती असते. परंतु, हा आजार कसा होतो आणि आजारांची लक्षणे काय असतात याबाबत संपूर्ण माहिती प्रत्येकांना मिळावी या उद्देषाने तामगाडगे ट्रस्ट डाॅट काॅम नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. भविष्यात सिकलसेल आजाराची साखळी तोडण्यास भरीव मदत करण्यासाठी तामगाडगे ट्रस्टतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या नोंदणी अभियानात जास्तीत जास्त ‘सिकलसेल वारियर्स’ यांनी नोंदणी करण्याचे आवाहनही ट्रस्टच्या उपाध्यक्षा लिना तामगाडगे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement