Published On : Sat, Mar 28th, 2020

गरीब,गरजवंत कुटुंबाला दिला मदतीचा हाथ!

Advertisement

नागपूर:- बुटी बोरी एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टाकळघाट,टेम्भरी,वाटेघाट,पोही,सालईदाभा,गणेशपूर, भारकस येथील २५ गरीब व गरजवंत कुटुंबाला राशन व रोख रक्कम वितरित करून बुटीबोरी एम आय डी सी पोलिसांनी दिला मदतीचा हाथ!

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लॉक डाऊन करून जमाव व संचारबंदी करण्यात आली आहे.त्यामुळे बुटीबोरी एम आय डी सी मध्ये कचरा,भंगार तसेच पोटाची खडगी भरण्यासाठी मिळेल ते काम करून नगदी पैसे घेऊन सकाळ संध्याकाळ ची चूल पेटविणारे अनेक कुटुंब आहेत.ज्यांना ना कालची चिंता ना उद्याची पर्वा जे फक्त आज व आताचाच विचार करित जगतात अशा २५ कुटुंबांना बुटी बोरी एम आय डी सी पोलिसांनी ५ किलो कणिक,दोन किलो तांदूळ,१ किलो सोयाबीन तेल व १०० रुपये अशी मदत करून आपल्या माणुसकीचा परिचय दिला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बुटीबोरी ही आशिया खंडातील सर्वात मोठी औधोगिक वसाहत आहे.त्यामुळे येथे देशाच्या विविध प्रांतातून अनेक जाती,धर्माचे लोक उदरनिर्वाह करण्यासाठी आले आहे.त्यांना औधोगिक क्षेत्रा जवळील ज्या गावात काम मिळेल तिथे ते राहू लागले.तथापि कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व यंत्रणाच कोलमडून पडल्यामुळे संपूर्ण देशात जमावबंदी व संचारबंदी लागू झाल्यामुळे यांच्या हाथाला कामच उरले नाही.

काम नसल्यामुळे पैसा नाही व पैसे नसल्यामुळे चूल कशी पेटवायची असा प्रश्न निर्माण झाला.अशातच बुटी बोरी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे ना पो शी इकबाल शेख हे आपले सहकारी पोलीस कर्मचारी प्रफुल राठोड,अमोल कोठेवार, प्रमोद बनसोड,विजय निकोसे यांनी केलेल्या मदतीने हे गरीब गरजवंत कुटुंब सुखावले असून मदतकर्ताचे मनोमन आभार मानले.परंतु अशा मदतीवर आम्ही किती दिवस जगणार?असा प्रश्न उपस्थित करून शासनाने आम्हाला राशन,पाणी व जीवनावश्यक वस्तू पुरवाव्यात अशी आशा व्यक्त केली.

Advertisement
Advertisement