Published On : Wed, Jun 9th, 2021

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा : हिंगे

Advertisement

कामठी :-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामन्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रशासनाला कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात बऱ्याचपैकी यश मिळाले आहे.या पाश्वरभूमीवर प्रशासन नाच्या वतीने आज 7 जून पासून कामठी तालुक्यात अनलॉक सुरू करण्यात आला असला तरी कोरोना गेला असा गृहीत धरू नका , आताही कोरोनाबाबत प्रशासनाने सांगितलेल्या त्रिसूत्री मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, निर्बंध शिथिल झाले म्हणून बेभान वावरू नका, सामाजिक अंतर पाळा या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हावे यासाठी तहसिलदार अरविंद हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कामठी पोलीस स्टेशन सभागृहात व्यापारी वर्गाचे मार्गदर्शक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत उपस्थित हॉटेल चालक, बार चालक, हॉल व लॉन व्यवसायिकाना कोरोनाच्या तिसरा लाटेचा सामना करण्यासाठी आपण सर्व सज्ज राहने गरजेचे आहे त्यासाठी अनलॉक संदर्भात प्रशासनाच्या वतीने ज्या अधिसूचना जाहीर करण्यात आल्या आहेत त्याचे पुरेपूर पालन करा, सामाजिक , सांस्कृतिक कार्यक्रम हॉल च्या 50 टक्के किंवा 100 व्यक्तीपर्यंत मुभा दिली आहे, लग्न समारंभ , मंगल कार्यालयाच्या 50 टक्के किंवा 100 लोकांची मर्यादा आकारली आहे याचे पालन करावे, कुणालाही कायदेशीर कारवाही करण्याकरिता भाग पाडू नका आणि आपण सर्वांनी प्रशासनाच्या मार्गदर्शक अधिसूचनांचे पुरेपूर पालन केल्यास तिसरी लाट थांबविण्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल तेव्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा असे आव्हान तहसिलदार अरविंद हिंगे यांनी केले.

याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे, दुय्यम पोलीस निरीक्षक काळे, जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीचे संचालणं व आभार मयूर बन्सोड यांनी केले,.बैठकीला मोठ्या संख्येत हॉल , लॉन चालक, बिअर बार, हॉटेल चालक आदी उपस्थित होते.