Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Feb 11th, 2020

  तक्रार निवारणासाठी आता ‘हॅलो महापौर ॲप’

  नागपूर, : नागरिकांना आपल्या समस्या, तक्रारी मांडण्यासाठी आता कुठेही जायची गरज पडणार नाही. आता थेट ‘हॅलो महापौर ॲप’वरून नागरिकांच्या तक्रारींचे समाधान होउ शकेल. ‘ॲप’च्या माध्यमातून आता नागरिकांना मोबाईलवरूनच आपल्या सूचना, तक्रारी थेट महापौरांपर्यंत पोहोचविता येणार आहेत.

  विशेष म्हणजे, ‘हॅलो महापौर ॲप’च्या माध्यमातून थेट महापौरांच्या व्हॉट्सॲपशी संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे नागरिकांची तक्रार स्वत: महापौर पाहून त्यावर प्रशासनाला निर्देशित करतील. महापौरांकडे आपल्या तक्रारी मांडल्यानंतर आपल्या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची माहितीही ‘ऑनलाईन’ घरबसल्या पाहता येणार आहे. ‘ॲप’साठी मनपा मुख्यालयात विशेष यंत्रणा कार्यरत राहणार आहे.

  ‘हॅलो महापौर ॲप’चे वैशिष्ट्ये

  – ॲपवरून थेट महापौरांच्या व्हॉट्सॲपशी कनेक्ट होता येईल

  – मनपाच्या विविध योजनांची माहिती मिळविता येईल

  – मनपाच्या दैनंदिन बातम्या पाहता येतील0012

  – झोन निहाय तक्रार नोंदविता येईल

  – ‘स्वच्छ नागपूर’ आयकॉनवरून कचरा संकलन करणा-या एजन्सीशी संपर्क साधता येईल

  – ‘गुगल मॅप’वरून आपल्या जवळील स्वच्छतागृह शोधता येतील

  – मनपातर्फे यशस्वीरित्या राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची ‘यशोगाथा’ ॲपद्वारे जाणता येईल

  अशी नोंदवा तक्रार

  १. गुगल प्ले-स्टोअरवरून ‘हॅलो महापौर’ हे ॲप डाउनलोड करा

  २. ‘तक्रार नोंदवा’ या आयकॉनवर क्लिक करा

  ३. आपले झोन, तक्रारीचे स्वरूप, पूर्ण नाव, संपर्क क्रमांक यासह संपूर्ण तक्रार नोंदवून ‘संपादन’ यावर क्लिक करा

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145