Published On : Sat, Jun 14th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात उभारणार ‘हेलिकॉप्टर हब’; मॅक्स एरोस्पेसच्या ८ हजार कोटींच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री फडणवीसांची साथ

Advertisement

मुंबई-नागपूरच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वपूर्ण भर टाकणारा मोठा प्रकल्प साकार होणार आहे. मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. ही कंपनी नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हेलिकॉप्टर निर्मितीचा भव्य प्रकल्प उभारणार असून, या उपक्रमासाठीचा सामंजस्य करार (MoU) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात, राज्याच्या उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन आणि मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी यांच्या हस्ते करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सीईओ पी. वेलरासू आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

२०२६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात
या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम २०२६ पासून सुरू होणार असून, आठ वर्षांच्या कालावधीत साधारण ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. सुमारे दोन हजार लोकांना रोजगाराच्या संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

नागपूरला संरक्षण उत्पादनात गती
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “हेलिकॉप्टर उत्पादनासाठी मॅक्स एरोस्पेसने महाराष्ट्र आणि विशेषतः नागपूरची निवड केल्याचा मला अभिमान आहे. नागपूरमध्ये आधीच संरक्षण उत्पादनासाठी अनुकूल वातावरण तयार केले गेले आहे. राज्य सरकार मॅक्स एरोस्पेसला संपूर्ण सहकार्य करणार आहे.”

अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उत्पादन केंद्र-
या प्रकल्पात जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश असून, रोटरी-विंग प्लॅटफॉर्म्सचं कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग यासाठी हे एक उत्कृष्टता केंद्र म्हणून काम करणार आहे. नागपूर विमानतळाच्या सान्निध्यामुळे लॉजिस्टिक सुविधाही या प्रकल्पासाठी फायदेशीर ठरणार आहेत.

मालक मलकानी यांचा महाराष्ट्रप्रेमाचा उल्लेख-
मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी यांनी सांगितले की, “मी मूळचा महाराष्ट्रीय आहे, म्हणूनच उद्योगाची सुरुवात महाराष्ट्रातूनच करायची असा निर्णय घेतला.” राज्य सरकारने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभारही मानले.या वेळी कंपनीचे इतर अधिकारी आणि सल्लागारही उपस्थित होते, ज्यामध्ये मेघना मलकानी, किरीट मेहता, जयेश मेहता, नीरज बेहेरे आणि देवदत्त वानरे यांचा समावेश होता.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement