Advertisement
नागपूर : जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील धनगौरी नगर, पवारी आणि पूनापूर परिसरांमध्ये पाणी साचल्याने काही नागरिक अडकून पडले होते.
धोकादायक स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ बचावकार्य हाती घेतले. पाण्यात अडकलेल्या एका महिलेचा, एका पुरुषाचा आणि दोन बालकांचा यशस्वीपणे रेस्क्यू करण्यात आला आहे. बचाव पथकाने वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
संपूर्ण नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, पूरजन्य भागांमध्ये प्रशासन सतर्क राहून बचावकार्य सुरू ठेवत आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.