नागपूर: एकीकडे नागरिक उन्हाच्या झळ्यांनी हैराण झाले असताना नागपुरात सायंकाळी ५ वाजताच्या सुरमारास विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात नागपुरात उन्हाळा चांगलाच तापायला सुरुवात झाली आहे. शनिवारी ४० व रविवारी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. त्यानंतर सोमवारी पुन्हा उन्हाचा पारा चढला होता मात्र आज ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावल्याने नागपूरकरांना उकाड्या पासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
Published On :
Tue, May 7th, 2024
By Nagpur Today