Published On : Mon, Jun 25th, 2018

मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार

Advertisement

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरांत पावसाने चांगली हजेरी लावली आहे. परळ, हिंदमाता, भायखळा, किंग्ज सर्कल या सखल भागांत पाणी साचलं आहे, तर पावसामुळे मुंबईची ‘लाइफलाईन’ विस्कळीत झाली आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटं उशीराने सुरू आहे. त्यामुळे कामावर निघणाऱ्या मुंबईकरांचा प्रवासात खोळंबा होण्याची शक्यता आहे.

मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पावसाची दमदार बॅटींग सुरू आहे. पालघर जिल्ह्याला पावसाने रात्रीपासूनच चांगलं झोडपलं आहे. वसई, विरार, नालासोपारा भागात जोरदार पाऊस सुरू आहे. तर नालासोपाराच्या सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांचा मनस्ताप होत आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी आणि डोंबिवलीतही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ठाण्यात पोखरण रोड येथे संरक्षक भिंत कोसळून दोन कारचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.