Published On : Mon, Jun 25th, 2018

आंतरजोडणीच्या कामामुळे आशी नगर झोनचा पाणीपुरवठा २६ जून रोजी राहणार बाधित

नागपूर: नागपूर सुधार प्रन्यास (NIT) यांनी पेंच ४ ८०० मिमी फीडर लाईनची आंतरजोडणी नारा प्रस्तावित जलकुंभाच्या ४००मिमी इनलेट वाहिनीशी करण्याचे काम २६ जून २०१८ रोजी हाती घेण्याचे ठरवले आहे.

या कामासाठी १५ तासांचा कालावधी लागणे अपेक्षित असून हे काम २६ जून रोजी सकाळी ११ वाजता सुरु करण्यात येणार आहे. यामुळे आशी नगर झोनचा (नारा व नारी/जरीपटका कमांड एरिया) पाणीपुरवठा बाधित राहील.

Advertisement

नारा, नारी व जरीपटका कमांड एरियातील भागांचा पाणीपुरवठा २६ जून रोजी पूर्णपणे बाधित राहील तर २७ जून रोजी सकाळी मर्यादित पाणीपुरवठा होईल. तसेच इंदोरा डायरेक्ट टॅपिंग व बेझनबाग जलकुंभ याअंतर्गत येणाऱ्या भागांनादेखील मर्यादित पाणीपुरवठा होईल.

पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:

नारा जलकुंभ– निर्मल सोसायटी, आराधना कॉलोनी, शंभू नगर, शिवगिरी लेआऊट, नूरी कॉलोनी, तावक्कल सोसायटी, आर्या नगर, ओम नगर, नारागाव, वेलकम सोसायटी, देवी नगर, प्रीति सोसायटी.

नारी व जरीपटका जलकुंभ—भीम चौक, हुडको कॉलोनी, नागार्जुन कॉलोनी, कस्तुरबा नगर, कुकरेजा नगर, मार्टिन नगर, विश्वास नगर, ख़ुशी नगर, LIG कॉलोनी, MIG कॉलोनी, सुगत नगर, कबीर नगर, कपिल नगर, कामगार नगर, रमाई नगर, दीक्षित नगर, सन्याल नगर, चैतन्य नगर, सहयोग नगर, मानव नगर, शेंडे नगर, राजगृह नगर, लहानुजी नगर.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement