Published On : Sat, Apr 15th, 2017

Maharashtra: पारा 45 अंश सेल्सीअसच्याही पार

Advertisement


मुंबई (Mumbai):
राज्यात उन्हाची लाट यंदा काहीशी जास्तच असून, राज्यातील काही शहरात पारा सरासरी 40 अंशाच्या पूढे गेला आहे. वर्धा जिल्ह्यात 45 अंश सेल्सिअसच्या पूडे गेला असून,या तापमानाची नोंद राज्यातील सर्वाधीक अशी करण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तवेलल्या अंदाजासनुसार पूढचे दोन दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडत असाल तर, स्वत:ची काळजी घ्या. कामाशिवाय बाहेर पडणे शक्यतो टाळा.

राज्यापलीकडे जाऊन देशातील तापामानाचा विचार करता, सौराष्ट्र, कच्छ आदी भागात उष्णतेची लाट कायम आहे. या भागातील कमाल तापमानात सरासरीपेक्षा 5 अंशांची वाढ झाली आहे. गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्याच परिणाम महाराष्ट्रातील तापमानावर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही सुर्यदेव भडकल्याचे चित्र आहे. राज्यात पूढचे दोन दिवस महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

दरम्यान, राज्याच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत यंदाच्या तापमानाची नोंद घेणारे आकडे चढेच आहेत. कधी नव्हे ते यंदा राज्यातील अनेक शहरांचे तापमान वाढले आहे. एकाच वेळी 22 शहरांचे तापमान वाढण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. राज्यातील 22 शहरांमध्ये कमाल तापमान 40 अंशांवर गेले आहे. मुंबईतही कमाल तापमान 35 अंशावर कायम आहे. वाढत्या उकाड्याने मुंबईकर हैरण झाले असून, मुंबईत उष्ण आणि कोरडे वारे वाहत असून, आर्द्रतेमध्येही वाढ होत आहे.

औरंगाबाद – 41.1
नाशिक ४०.९ – 40.9
परभणी – 43.1
पुणे – 40.1
सांगली – 40.4
सातारा – 40.1
सोलापूर – 42.2
अकोला – 41.1
अमरावती – 41.6
बुलढाणा – 40.6
चंद्रपुर – 42.6
गोंदीया – 42.6
नागपूर – 42.8
वासीम – 40.8
वर्धा – 43.5
यवतमाळ – 42.5
अहमदनगर – 42.2
जळगाव – 43.2
नांदेड – 43
उस्मानाबाद – 41.3
बीड – 41.6