नागपूर : पाचपावली सुतिकागृहमध्ये डॉक्टर राहत नाही व ऑपरेशन ही होत नाही अश्या तक्रारी वारंवार रुग्णांकडून येत असल्याने नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन यांनी पाचपावली सुतिकागृह ला बुधवारी (२५ ऑगस्ट) आकस्मिक भेट दिली.
यावेळी सभापती यांचेसमवेत अति. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेन्द्र बहिरवार व डॉ. विजय जोशी उपस्थित होते. महाजन यांनी तेथे उपस्थित डॉक्टर्स व नर्सेस सोबत चर्चा केली असता डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, सुतिकागृह मध्ये ४ डॉक्टर कार्यरत आहे. ते शिफ्ट मध्ये काम करतात. ऑपरेशनकरीता सधणी रोग तज्ञ उपलब्ध नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात ऑपरेशन बंद ठेवण्यात आलेले आहे, असे त्यांना सांगण्यात आले.
यावर सभापती यांनी सांगितले की लवकरात – लवकर ऑपरेशन सुरु करण्याची व्यवस्था करावी तसेच दवाखाना योग्यरित्या चालविण्याकरीता योग्य ती कार्यवाही करुन त्याचा अहवाल त्यांना सादर करावा.
