Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Dec 18th, 2018

  हॉकर्स अधिनियमासंदर्भात कार्यशाळेतून जनजागृती

  मनपा समाज कल्याण विभाग व नागपूर जिल्हा हॉकर्स संघाचे आयोजन

  नागपूर: रस्त्यावर व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या हॉकर्ससाठी तयार करण्यात आलेल्या जीविका संरक्षण व पथ विक्रेय अधिनियमासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मंगळवारी (ता. १८) नागपूर महानगरपालिका समाज कल्याण विभाग, दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व नागपूर जिल्हा हॉकर्स संघाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

  यावेळी समाज कल्याण सभापती प्रगती पाटील, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नागपूर जिल्हा हॉकर्स संघाचे अध्यक्ष जम्मु आनंद, पोलिस निरीक्षक (वाहतूक) जयेश भांडारकर, कॉन्फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ इंडियन ट्रेडर्सचे अध्यक्ष बी.सी. भरतीया यांच्यासह विविध हॉकर्स संघटनांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

  हॉकर्सनी आपल्या हक्काची लढाई लढताना ती कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच लढावी. आपल्या स्वार्थासाठी उपयोग करणा-या लोकांच्या मागे न जाता अधिकारात राहून सामाजिक बांधिलकी जपा. कायदे, नियम तोडू नका, असे आवाहन यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांनी केले.

  कार्यशाळेमध्ये नागपूर जिल्हा हॉकर्स संघाचे अध्यक्ष जम्मु आनंद यांनी हॉकर्स अधिनियमासंर्भात विस्तृत माहिती दिली. हॉकर्सच्या हितासाठी २०१४ साली अधिनियम लागू करण्यात आला. हॉकर्सना हक्क प्रदान करणारा हा कायदा असून अत्यंत प्रगतीशील कायदा असल्याचे ते म्हणाले. हॉकर्स अधिनियम एकूण दहा भागात विभाजीत करण्यात आले आहे. यामध्ये परिभाषा, विक्रेत्यांचे नियमन, हॉकर्सचे अधिकार, पूनर्वसन किंवा पर्यायी व्यवस्था करणे, वादविवाद मिटविण्यासाठी व्यवस्था, पथविक्रीसाठी नियोजन, हॉकर्स समिती, हॉकर्सवरील अन्याय, दंडात्मक कारवाई व इतर मुद्दे यांचा समावेश असल्याचे जम्मु आनंद यांनी यावेळी सांगतिले.

  हॉकर्सच्या हिताच्या कायद्यामधील तरतुदी व पुढे हॉकर्सना कायद्याचा होणारा उपयोग, हॉकर्सचे अधिकार, त्यांचे हक्क यांची विस्तृत माहिती जम्मु आनंद यांनी दिली. मात्र हॉकर्सनी परवाना बनविल्याशिवाय या कायद्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. त्यामुळे परवान्याविना अनधिकृत म्हणून गणल्या जाणा-या सर्व हॉकर्सनी परवाना घेउन अधिकृत होउन जाण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी विविध हॉकर्स संघटनेच्या पदाधिका-यांनी आपल्या शंका मांडून त्यांचे निरसरण करून घेतले.

  कार्यशाळेच्या आयोजनासाठी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे व्‍यवस्थापक प्रमोद खोब्रागडे, विनय त्रिकोलवार, रितेश बांते, नुतन मोरे यांनी सहकार्य केले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145