Published On : Sun, Jun 14th, 2020

कोरोना बाधित आढळल्यामुळे हसीब फार्मसिटीकल कंपनी बंद- ठाकरे

– ग्रामीण भागात 91 बाधितांची नोंद, औधोगिक क्षेत्रात सोशल सिस्टीनशिग चे नियम पाळावे

नागपूर – दिगडोह येथील हसीब फार्मसिटीकल कंपनीत तीन कोरोना बाधितरुग्ण आढळल्या मुळे पुढील आदेशा पर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून नागरिक व उधोग समूहांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, हिंगणा, बुटोबोरी, कळमेश्वर आदी क्षेत्रात उधोग सुरु करताना कोरोना सोशल डिस्टींग , मास्क चा वापर व सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे, नियमाचे पालन न करणाऱ्या कंपन्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे.


मौझा भीमनागर, ईसासनी, हिंगणा येथे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, हे तिन्ही हसीब फटमासिटीकल येथील कर्मचारी आहेत, हिंगणा तहशीलदार संतोष खंडारे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत ही कारवाई केली, उप विभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे.