Published On : Sun, Jun 14th, 2020

रामटेक येथे भगिनी मंडळाच्या वतीने गरजूंना ६५०किराणा रेशन किट व मास्कचे वाटप

रामटेक – लॉकडाऊनमुळे आज समाजातील प्रत्येक घटक त्रस्त झाला आहे. अशातच रोजमजुरी करणार्‍या मजुरांवर रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. रामटेक भगिनी मंडळाच्या माध्यमातून रेशन किट व मास्क तयार करून गरीब कुटुंबास वाटप करण्यात आली. रामटेक भगिनी मंडळाच्या माध्यमातुन विशेष उपक्रम राबविण्यात आले. मागील दोन महीन्यापासुन भगिनी मंडळाचे वेगवेगळे उपक्रम चालु आहे लॉकडाउन असल्यामुळे गरीब परिवारावर उपासमारीची वेळ व वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशावेळी आपल्या स्तुत्य उमक्रमाने समाजसेवेचा ठसा समाजासमोर उमटविणारे , नेहमी तन, मन धनाने गरजु करिता आपले मोलाचे सहकार्य देनाऱ्या भगींनी मंडळाच्या अध्यक्षा समाजसेविका ज्योति कोल्लेपरा यांनी प्रमुख्याने मोलाचे योगदान दिले. ज्योती कोल्लेपरा यांनी ६५० राशन कीटचे निर्माण स्वखर्चाने केले .विशेष म्हणजे ही कीट त्यांनी घरी तयार करुन स्वतः गरीब परीवारापर्यंत जाउन त्यांची मदत म्हणून गरीब परिवारांनाही भगिनी मंडळ तर्फे भेट म्हणून दीली. त्यासोबतच त्यांनी शोभा अडामे यांनी घरी तयार केलेले मास्क सुद्धा गरीबांना भेट म्हणून दिले. या सामाजिक कार्यासाठी आपल्या नेहमी मदत करणारे मंडळाच्या उपाध्यक्षा शोभा अडामे सचीव मीनल भारंबे व लता कांबळे, उज्ज्वला धमगाये , चित्रा धुरई , सवीता बांते व समस्त भगिनी आणि विशेष सहकार्य देण्यासाठी, अपूर्व गोपी कोल्लेपरा, यांचे विशेष मनपूर्वक आभार ज्योति कोल्लेपरा यांनी मानले.

आमच्या प्रतिनिधींशी बोलताना ज्योतीताई कोल्लेपरा यांनी सांगितले की ,” कोरोनाच्या काळात सामान्य व गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यांचे कामधंदे बंद झाल्याने ते संकटात सापडले आहेत.त्यांना आधार मिळावा म्हणून आम्ही ऑटो चालकांना , रोजमजुरी करणाऱ्या लोकांना, मनसर येथील गरीब कुटुंबांना घरी जाऊन रेशन किटचे वाटप केले.

उन्हाळयात कोरोनायोद्धा म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दररोज चहा सरबत व वेगवेगळे पेय वाटपाचे काम रामटेक भगिनी मंडळाच्या वतीने करण्यात आले.

गरजु कुटुंबांनी संकटकालीन काळात एक हात मदतीचा दिल्याबद्दल माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आणि समाजसेविका ज्योती कोल्लेपरा यांचे आभार मानले.