नागपूर : देशात सर्वाधिक पान टपऱ्या कुठे असतील, तर त्या नागपूरमध्येच आहेत, असा थेट गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे. खर्रा, गुटखा आणि पानमसाला विक्रीवर महाराष्ट्रात वर्षानुवर्षे बंदी असतानाही नागपूरमध्ये ही विक्री खुलेआम सुरू असून, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकारामुळे नागपूरमध्ये तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाणही झपाट्याने वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, हे सगळं राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःच्या गृहनगरातच घडत आहे.
नियम फक्त कागदावर?कुठे आहे बंदीची अंमलबजावणी?
प्रश्न विचारणारी ही भूमिका आता केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर नागपूरकरांमध्येही संताप निर्माण करत आहे.
स्वातंत्र्य पत्रकार अनजया अनपारथी यांचा सवाल-
या प्रकरणावर स्वातंत्र्य पत्रकार अनजया अनपारथी यांनी ट्विट करत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटले, “तोंडाचा कॅन्सर वाढतोय, शाळेजवळ गुटखा मिळतोय आणि प्रशासन शांत. नागपूर हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे शहर आहे, पण कायदा कुणासाठी?”
त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, नागरिकही आता आवाज उठवत आहेत
मुख्य मुद्दे :
नागपूरमध्ये देशातील सर्वाधिक पान टपऱ्या –
राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असूनही खुलेआम विक्री
तोंडाच्या कॅन्सरमध्ये नागपूरचा पहिला क्रमांक
पत्रकार अनजया अनपारथी यांचा सवाल : “कायदा कुणासाठी?”
नागपूर प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात