Published On : Sun, Sep 1st, 2019

हरितालिका गौरीपूजन उत्साहात साजरा

कामठी :-दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा परंपरागत चालत आलेला भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया म्हणजेच ‘हरितालिका पूजन’कार्यक्रम कामठी तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला .तर अखंड सौभाग्याचे वरदान मिळावे यासाठी मोठ्या संख्येतील सुवासिनींनी कामठी छावणी परिषद हद्दीतील श्री तीर्थक्षेत्र महादेव घाट कन्हान नदीत हरितालिकेची पूजा करीत गौरीविसर्जन केले .

या हरितालिका गौरी पूजन उत्साह नुसार तालुक्यातील महिलांनी नऊ दिवस अगोदरच गौर म्हणून एका परडीवर गाईच्या शेणाची बारीक चुर करून त्यात गहू टाकले आणि मग ते हरितालिकेच्या दिवशी गौरी पूजन करून गौरीची हळद, कुंकू बेल फुल वाहून पूजा करून आंघोळ घातले आणि महिला सौभाग्याचे लेन म्हणून एकमेकांच्या घरी जाऊन टोपलीचे वाण दिले आणि दुसऱ्या दिवशी अनेक महिलानि एकत्र येऊन सकाळी गौरी हातात घेऊन नवीन वस्त्र परिधान करुन येथील श्री तीर्थक्षेत्र महादेव घाट कन्हान नदीवर जाऊन आरती पूजा करून गौरीचे विसर्जन केले .कन्हान नदीला पूर आल्यामुळे गौरीविसर्जन कार्यक्रमात कुठलीही अनुचित घटना न घडो यासाठी सतर्कता बाळगत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांनी कडक पोलिस बंदोबस्त लावला होता तसेच ढिवर समाजाची कोळी पथक सुद्धा नेमन्यात आले होते.

संदीप कांबळे कामठी