Published On : Fri, Mar 27th, 2015

मुंबई : रामनवमी निमित्त मुख्यमंत्र्यांकडून जनतेला शुभेच्छा


Devendra fadanvis
मुंबई।
प्रभू श्री रामचंद्रांचे जीवन हे त्याग, सत्यवचन, संस्कृती आणि उदात्त नैतिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश देते. यासर्व गुणांचा अंगिकार करुन एक भक्कम राष्ट्र घडविण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण सहभागी होऊ या, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांची जयंती रामनवमी म्हणून साजरी केली जाते. प्रचंड अडचणीतहीसंयम व संस्कारशीलतेने मार्ग काढण्याचा संदेश प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनातून प्राप्त होतो. मराठी नूतनसंवत्सर प्रारंभ झाल्यानंतर हा पहिला मोठा उत्सवभक्तीभावाने उत्साहात साजरा होतो. सत्प्रवृत्तींचा नेहमीच दुष्प्रवृत्तींवर विजय होत असतो, हा संदेश रामचरित्रातून मिळतो. श्री रामचंद्रांच्या जीवनाचा आदर्श ठेऊन वाटचाल करण्याचा प्रयत्न आपणयानिमित्ताने करू या, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.