Published On : Mon, Nov 12th, 2018

दीपावलीच्या च्या शुभपर्वावर सुमधुर गीतांची मेजवानी

डॉ .अमोल देशमुख यांच्या आयोजित स्तुत्य उपक्रमाला रामटेककर रसिकांची दाद

रामटेक शहर प्रतिनिधी- दिवाळीचा सण सर्वांसाठीच आनंददायी व नवी पर्वणी घेऊन येणारा असतो.त्यावेळी विविध ठिकाणी विभिन्न व नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दीपावलीच्या शुभ पर्वावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे समन्वयक डॉ. अमोलबाबू देशमुख यांच्या रामटेक येथील निवास स्थानी दिवाळी मिलन व स्वरसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ अमोल देशमुख विविध धार्मिक व सामाजिक पर्वावर विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात .दीपावलीचे औचित्य साधून त्यांनी रामटेक येथ स्वरानंद तर्फे आयोजित कार्यक्रमात सुरेल व सुमधुर गीतांची मेजवानी सादर केली.

या कार्यक्रमाला विभिन्न क्षेत्रातील मान्यवर मंडळी, पदाधिकारी ,कार्यकर्ते,परिसरातील रामटेक तसेच ग्रामीण भागातील जनता व महिला वर्गानी हजेरी लावली होती.कार्यक्रमाप्रसंगी रूपाताई देशमुख, डॉ.सुचिता देशमुख,डॉ.शशी गुप्ता,हर्षवर्धन निकोसे,तुलसाबाई महाजन, नीलकंठ महाजन,माधुरी उईके, बबलू दुधबर्वे आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सफलतार्थ उन्मेश धोटे, अनिल भोरसले, शफी शेख,प्रमोद काकडे ,रवी चौरे, यांनी मोलाचे सहकार्य केले.