Published On : Wed, Oct 20th, 2021

एसटी कामगारांची दिवाळी आनंदात!

– पगारासह बोनसची अपेक्षा

नागपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती गंभीर आहे. कर्मचाèयांना पगार देण्यासाठी निधी नाही. वेळेवर पगार मिळावा, एवढीच कामगारांची अपेक्षा आहे. परंतु आत्ता महामंडळाची गाडी रूळावर येत आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. इतरांप्रमाणे एसटी कामगारांनाही दिवाळी साजरी करायची आहे, त्यापृष्ठभूमीवर पगारासह बोनसही मिळावा अशी कामगारांची अपेक्षा आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला होता. त्यामुळे कामगारांना पगार देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. परिणामी कामगारांचे वेतन थकीत होते. त्यामुळे गेल्या वर्षी एसटी बस वाहतूक बंद असताना शासनाकडून मिळालेल्या आर्थिक मदतीतून कामगारांचे कामगारांचे पगार झाले. पुन्हा २०२१ च्या सुरूवातीलाही अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली. सप्टेंबरचा पगारालाही उशिर झाला. आता आक्टोबरच्या पगाराची प्रतीक्षा आहे. पगाराची नियोजित तारीख ७ आहे. पण ४ नोव्हेंबला दिवाळी आहे. त्यापूर्वी कामगारांना पगार मिळावा, अशी अपेक्षा आहे.
अलिकडेच केंद्र सरकारच्या कर्मचाèयांना बोनस मिळाला. त्याच प्रमाणे राज्य शासनाच्या कर्मचाèयांनाही बोनस मिळतो. त्याच पृष्ठभूमीवर एसटी कामगारांनाही बोनस देण्यात यावा, अशी अपेक्षा आहे. एसटी कामगारांना बोनस देण्याची प्रथा आहे. २०१९ या वर्षात अडीच हजार रूपये बोनस देण्यात आला. मात्र, कोरानामुळे २०२० या वर्षात बोनस मिळाला नाही.


राज्य शासनाच्या कर्मचाèयांप्रमाणे एसटी कामगारांना इतर भत्ते मिळावेत यासाठी कामगारांचा लढा आहे. शासकीय कामगारांचा महागाई भत्ता २८ टक्के असून एसटी कामगारांना फक्त १२ टक्के दिला जातो, घरभाडे भत्ता ७, १४ आणि २१ अशा प्रमाणात मिळतो. तर वार्षीक वेतनवाढ केवळ २ टक्के दिली जाते. आता कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला आहे. सनासुदीचे दिवस असल्याने प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. एकंदरीत एसटीला चांगले दिवस आलेत. यामाध्यमातून एसटीची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कामगारांची दिवाळी आनंदात होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.

आर्थिक संकटामुळे जीवन यात्रा संपविली
एसटी कामगारांना आधीच कमी पगार त्यातही कोरोनाचा उद्रेक वाढल्यामुळे (२३ मार्च २०२०) आजपर्यंत वेळेवर पगार मिळाला नाही. आर्थिक संकट वाढत गेल्याने राज्यातील एकूण २५ कामगारांनी आपली जीवन यात्रा संपविली, असा आरोप एसटी कामगार संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार, विभागीय अध्यक्ष प्रज्ञाकर चंदनखेडे आणि विभागीय सचिव प्रशांत बोकडे यांनी केला आहे. लखिमपूरच्या घटनेसाठी महाराष्ट्र बंद करता आणि एसटी कामगारांसाठी काय? या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले.

सन २०१६-२०२० ४८४९ एकतर्फी कराराचे १५०० कोटी रक्कम शिल्लक असून सुध्दाअत्यंत अल्प पगारात कर्मचाèयांना काम करावे लागत आहे. शासकीय कर्मचाèयांप्रमाणे इतर भत्ते मिळत नाही, त्यामुळे कर्मचाèयात असंतोष आहे. एसटी कामगारांची आर्थिक अडचणी वेळेवर दूर केली नाही तर मोठे आंदोलन उभारण्याची तयारी एसटी कामगार संघटना करणार, असा ईशाराही त्यांनी दिला.