भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितिन नवीनजी यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून देशाला संबोधित करत असतानाच, त्या शुभमुहूर्तावर जामसांवली येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात विशेष पूजन व आरतीचे आयोजन करण्यात आले. शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले असून, श्री नितिन नवीनजींचा कार्यकाळ यशस्वी व्हावा यासाठी प्रभूंच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. हनुमानजींच्या आशीर्वादाने व जनतेच्या उदंड प्रतिसादामुळे माननीय श्री नितिनजी गडकरी, श्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपाचे सर्व महापौर व आमदार यांच्या कार्याला जनतेकडून मोठा सन्मान मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याच जनसमर्थनाच्या जोरावर नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयाचे ‘शतक’ पूर्ण झाल्याबद्दल देवाचे आभार मानण्यात आले. या प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेविका सौ. प्रमिला गौर, कार्यालय मंत्री ब्रजभूषण शुक्ला, मंत्री अमोल कोल्हे, अजय गौर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.









